दूर मनोर्‍यात

वादळला हा जीवनसागर – अवसेची रात
पाण्यावर खळबळा लोळतो रुसलेला वात

भांबावुनी आभ्रांच्या गर्दित गुदमरल्या तारा
सुडाने तडतडा फाडतो उभे शीड वारा

पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली
प्रचंड भिंगापरी फुटते जळ आदळुनी खाली

प्रवासास गल्बते आपुली अशा काळरात्री
वावटळीतिल पिसांप्रमाणे हेलावत जाती

परन्तु अन्धारात चकाके बघा बंदरात
स्तम्भावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत

किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी
काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी

उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोर्‍यात
अन् लावा ह्रुदयात सख्यांनो आशेची वात

– कुसुमाग्रज

Similar Posts

  • स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या

    स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या, राजस राजकुमाराअपार माझ्या काळोखाला दिलास जीवनतारा सुंदर आता झाली धरती, सुंदर नभ हे वरतीवैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती मनात माझ्या मोरपीसांचा फुलला रंग पिसारारात्र एक मी अथांग होते नव्हता दीप उशाला जागही नव्हती, नीजही नव्हती, नव्हता अर्थ कशालाहारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा – कुसुमाग्रज

  • माझे जगणे होते गाणे 

    जाता जाता गाईन मीगाता गाता जाईन मीगेल्यावरही या गगनातीलगीतांमधुनी राहीन मी माझे जगणे होते गाणेकधी मनाचे कधी जनाचेकधी घनाशय कधी निराशयकेवळ नाद तराणे आलापींची संथ सुरावळवा रागांचा संकर गोंधळकधी आर्तता काळजातलीकेव्हा फक्त बहाणे राईमधले राजस कूजनकधी स्मशानामधले क्रंदनअजणातेचे अरण्य केव्हाकेव्हा शब्द शहाणे जमले अथवा जमले नाहीखेद खंत ना उरले काहीअदृष्यातील आदेशांचेओझे फक्त वाहणे – कुसुमाग्रज

  • कणा

    ओळखलत का सर मला पावसात आला कोणीकपडे होते कर्दमलेले केसावरति पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुनगंगामाई पाहुणि आलि गेली घरटयात राहुन माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतित नाचलीमोकळ्या हाती जाईल कशी बायको माञ वाचली भिंत खचली चूल वीझली होते नव्हते नेलेप्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी माञ ठेवले कारभारणीला घेऊण संगे सर आता लढतो आहेपडकी भिंत बान्धतो…

  • अनंत

    एकदा ऐकले काहींसें असेंअसीम अनंत विश्वाचे रणत्यात हा पृथ्वीचा इवला कण त्यांतला आशिया भारत त्यांतछोट्याशा शहरीं छोट्या घरांत घेऊन आडोसा कोणी ‘मी’ वसेंक्षुद्रता अहो ही अफाट असें!भिंतीच्या त्रिकोनी जळ्मट जाळीबांधून राहती कीटक कोळी तैशीच सारी ही संसाररीतीआणिक तरीही अहंता किती?परंतु वाटलें खरें का सारें?क्षुद्र या देहांत जाणीव आहेजिच्यात जगाची राणीव राहे! कांचेच्या गोलांत बारीक तातओतीत…

  • सागर

    आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळेनिळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडेहजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो कितीदंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबतेदेश दूरचे बघावयाला जावेसे वाटते तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतोत्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो…

  • मौन

    शिणलेल्या झाडापाशीकोकिळा आलीम्हणाली, गाणं गाऊ का?झाड बोललं नाहीकोकिळा उडून गेली. शिणलेल्या झाडापाशीसुगरण आलीम्हणाली, घरटं बांधू का?झाड बोललं नाहीसुगरण निघून गेली. शिणलेल्या झाडापाशीचंद्रकोर आलीम्हणाली, जाळीत लापु का?झाड बोललं नाहीचंद्रकोर मार्गस्थ झाली. शिणलेल्या झाडापाशीबिजली आलीम्हणाली, मिठीत येऊ का?झाडाचं मौन सुटलंअंगाअंगातुन होकारच तुफान उठलं! – कुसुमाग्रज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *