माझे जगणे होते गाणे 

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी

माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे

– कुसुमाग्रज

Similar Posts

  • मौन

    शिणलेल्या झाडापाशीकोकिळा आलीम्हणाली, गाणं गाऊ का?झाड बोललं नाहीकोकिळा उडून गेली. शिणलेल्या झाडापाशीसुगरण आलीम्हणाली, घरटं बांधू का?झाड बोललं नाहीसुगरण निघून गेली. शिणलेल्या झाडापाशीचंद्रकोर आलीम्हणाली, जाळीत लापु का?झाड बोललं नाहीचंद्रकोर मार्गस्थ झाली. शिणलेल्या झाडापाशीबिजली आलीम्हणाली, मिठीत येऊ का?झाडाचं मौन सुटलंअंगाअंगातुन होकारच तुफान उठलं! – कुसुमाग्रज

  • कणा

    ओळखलत का सर मला पावसात आला कोणीकपडे होते कर्दमलेले केसावरति पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुनगंगामाई पाहुणि आलि गेली घरटयात राहुन माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतित नाचलीमोकळ्या हाती जाईल कशी बायको माञ वाचली भिंत खचली चूल वीझली होते नव्हते नेलेप्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी माञ ठेवले कारभारणीला घेऊण संगे सर आता लढतो आहेपडकी भिंत बान्धतो…

  • डाव

    तिन्ही सांजच्या धुक्यातकिती कळशी घेऊनकुंकाउ कापली भरूनगेलीस तू वाट पाहून माझेशेवाळलेले डोळेपाय भयभीत वाले नदीकडेतेथे काळे तुझा डावघाट पदे घाटावररेषा कुंकवाच्या चार पाण्यावरी – कुसुमाग्रज

  • निरोप

    गर्दीत बाणासम ती घुसोनिचाले, ऊरेना लव देहभानदोन्ही करांनी कवटाळूनीयावक्ष:स्थळी बालक ते लहान लज्जा न, संकोच नसे, न भीतीहो दहन ते स्त्रीपण संगरातआता ऊरे जीवनसूत्र एकगुंतोनी राहे मन मात्र त्यात बाजार येथे जमला बळींचातेथेही जागा धनिकांस आधीआधार अश्रूसही दौलतीचादारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी चिंध्या शरीरावरी सावरोनीराहे जमावात जरा उभी तीकोणी पहावे अथवा पुसावे?एकाच शापातून सर्व जाती निर्धार…

  • स्वार

    घनदाट अरण्यांमधुनीबेफाम दौडतो स्वार अवसेच्या राक्षस रात्रसाचला नाभी अंधार स्तब्धात नाडिती टापाखणखणत खडकावरती निद्राला तरूंच्या रांगाभयचकित होऊनि बघती गतिधुंद धावतो स्वारजखमांची नव्हती जण दुरांतील दीपांसाठीनजरेत साठले प्राण मंझिल अखेरी आलेतो स्फटिकचिरांचा वाडा पाठीवर नव्हता स्वारथांबला अकेला घोडा – कुसुमाग्रज

  • स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या

    स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या, राजस राजकुमाराअपार माझ्या काळोखाला दिलास जीवनतारा सुंदर आता झाली धरती, सुंदर नभ हे वरतीवैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती मनात माझ्या मोरपीसांचा फुलला रंग पिसारारात्र एक मी अथांग होते नव्हता दीप उशाला जागही नव्हती, नीजही नव्हती, नव्हता अर्थ कशालाहारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा – कुसुमाग्रज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *