मौन

शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
सुगरण आली
म्हणाली, घरटं बांधू का?
झाड बोललं नाही
सुगरण निघून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लापु का?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.

शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत येऊ का?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन होकारच तुफान उठलं!

– कुसुमाग्रज

Similar Posts

  • स्वार

    घनदाट अरण्यांमधुनीबेफाम दौडतो स्वार अवसेच्या राक्षस रात्रसाचला नाभी अंधार स्तब्धात नाडिती टापाखणखणत खडकावरती निद्राला तरूंच्या रांगाभयचकित होऊनि बघती गतिधुंद धावतो स्वारजखमांची नव्हती जण दुरांतील दीपांसाठीनजरेत साठले प्राण मंझिल अखेरी आलेतो स्फटिकचिरांचा वाडा पाठीवर नव्हता स्वारथांबला अकेला घोडा – कुसुमाग्रज

  • माझे जगणे होते गाणे 

    जाता जाता गाईन मीगाता गाता जाईन मीगेल्यावरही या गगनातीलगीतांमधुनी राहीन मी माझे जगणे होते गाणेकधी मनाचे कधी जनाचेकधी घनाशय कधी निराशयकेवळ नाद तराणे आलापींची संथ सुरावळवा रागांचा संकर गोंधळकधी आर्तता काळजातलीकेव्हा फक्त बहाणे राईमधले राजस कूजनकधी स्मशानामधले क्रंदनअजणातेचे अरण्य केव्हाकेव्हा शब्द शहाणे जमले अथवा जमले नाहीखेद खंत ना उरले काहीअदृष्यातील आदेशांचेओझे फक्त वाहणे – कुसुमाग्रज

  • काटा रुते कुणाला

    काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणीमज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाचीचिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे काही करु पहातो, रुजतो अनर्थ तेथेमाझे अबोलणे ही विपरीत होत आहे हा स्नेह वंचना की काहीच आकळेनाआयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे – शांता शेळके

  • सागर

    आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळेनिळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडेहजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो कितीदंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबतेदेश दूरचे बघावयाला जावेसे वाटते तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतोत्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो…

  • दोन दिवस

    दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेलेहिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झालीभाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिलेकधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आलेतेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून…

  • डाव

    तिन्ही सांजच्या धुक्यातकिती कळशी घेऊनकुंकाउ कापली भरूनगेलीस तू वाट पाहून माझेशेवाळलेले डोळेपाय भयभीत वाले नदीकडेतेथे काळे तुझा डावघाट पदे घाटावररेषा कुंकवाच्या चार पाण्यावरी – कुसुमाग्रज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *