अनंत

एकदा ऐकले काहींसें असें
असीम अनंत विश्वाचे रण
त्यात हा पृथ्वीचा इवला कण

त्यांतला आशिया भारत त्यांत
छोट्याशा शहरीं छोट्या घरांत

घेऊन आडोसा कोणी ‘मी’ वसें
क्षुद्रता अहो ही अफाट असें!
भिंतीच्या त्रिकोनी जळ्मट जाळी
बांधून राहती कीटक कोळी

तैशीच सारी ही संसाररीती
आणिक तरीही अहंता किती?
परंतु वाटलें खरें का सारें?
क्षुद्र या देहांत जाणीव आहे
जिच्यात जगाची राणीव राहे!

कांचेच्या गोलांत बारीक तात
ओतीत रात्रीत प्रकाशधारा
तशीच माझ्या या दिव्याची वात
पाहते दूरच्या अपारतेंत!

अथवा नुरलें वेगळेंपण
अनंत काही जेंत्याचाच कण!
डोंगरदऱ्यांत वाऱ्याची गाणीं
आकाशगंगेत ताऱ्यांचे पाणीं

वसंतवैभव उदार वर्षा
लतांचा फुलोरा
केशरी उषा….प्रेरणा यांतून सृष्टीत स्फुरे
जीवन तेज जें अंतरी झरे

त्यानेच माझिया करी हो दान
गणावे कसे हें क्षुद्र वा सान?

– कुसुमाग्रज

Similar Posts

  • कोलंबसचे गर्वगीत

    हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारेविराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविताआणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतानजमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान…

  • दूर मनोर्‍यात

    वादळला हा जीवनसागर – अवसेची रातपाण्यावर खळबळा लोळतो रुसलेला वात भांबावुनी आभ्रांच्या गर्दित गुदमरल्या तारासुडाने तडतडा फाडतो उभे शीड वारा पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवतालीप्रचंड भिंगापरी फुटते जळ आदळुनी खाली प्रवासास गल्बते आपुली अशा काळरात्रीवावटळीतिल पिसांप्रमाणे हेलावत जाती परन्तु अन्धारात चकाके बघा बंदरातस्तम्भावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणीकाळोखावर खोदित बसला तेजाची…

  • डाव

    तिन्ही सांजच्या धुक्यातकिती कळशी घेऊनकुंकाउ कापली भरूनगेलीस तू वाट पाहून माझेशेवाळलेले डोळेपाय भयभीत वाले नदीकडेतेथे काळे तुझा डावघाट पदे घाटावररेषा कुंकवाच्या चार पाण्यावरी – कुसुमाग्रज

  • मौन

    शिणलेल्या झाडापाशीकोकिळा आलीम्हणाली, गाणं गाऊ का?झाड बोललं नाहीकोकिळा उडून गेली. शिणलेल्या झाडापाशीसुगरण आलीम्हणाली, घरटं बांधू का?झाड बोललं नाहीसुगरण निघून गेली. शिणलेल्या झाडापाशीचंद्रकोर आलीम्हणाली, जाळीत लापु का?झाड बोललं नाहीचंद्रकोर मार्गस्थ झाली. शिणलेल्या झाडापाशीबिजली आलीम्हणाली, मिठीत येऊ का?झाडाचं मौन सुटलंअंगाअंगातुन होकारच तुफान उठलं! – कुसुमाग्रज

  • स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या

    स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या, राजस राजकुमाराअपार माझ्या काळोखाला दिलास जीवनतारा सुंदर आता झाली धरती, सुंदर नभ हे वरतीवैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती मनात माझ्या मोरपीसांचा फुलला रंग पिसारारात्र एक मी अथांग होते नव्हता दीप उशाला जागही नव्हती, नीजही नव्हती, नव्हता अर्थ कशालाहारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा – कुसुमाग्रज

  • निरोप

    गर्दीत बाणासम ती घुसोनिचाले, ऊरेना लव देहभानदोन्ही करांनी कवटाळूनीयावक्ष:स्थळी बालक ते लहान लज्जा न, संकोच नसे, न भीतीहो दहन ते स्त्रीपण संगरातआता ऊरे जीवनसूत्र एकगुंतोनी राहे मन मात्र त्यात बाजार येथे जमला बळींचातेथेही जागा धनिकांस आधीआधार अश्रूसही दौलतीचादारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी चिंध्या शरीरावरी सावरोनीराहे जमावात जरा उभी तीकोणी पहावे अथवा पुसावे?एकाच शापातून सर्व जाती निर्धार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *