दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

– नारायण सुर्वे

Similar Posts

  • काटा रुते कुणाला

    काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणीमज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाचीचिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे काही करु पहातो, रुजतो अनर्थ तेथेमाझे अबोलणे ही विपरीत होत आहे हा स्नेह वंचना की काहीच आकळेनाआयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे – शांता शेळके

  • कणा

    ओळखलत का सर मला पावसात आला कोणीकपडे होते कर्दमलेले केसावरति पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुनगंगामाई पाहुणि आलि गेली घरटयात राहुन माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतित नाचलीमोकळ्या हाती जाईल कशी बायको माञ वाचली भिंत खचली चूल वीझली होते नव्हते नेलेप्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी माञ ठेवले कारभारणीला घेऊण संगे सर आता लढतो आहेपडकी भिंत बान्धतो…

  • कोलंबसचे गर्वगीत

    हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारेविराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविताआणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतानजमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान…

  • मौन

    शिणलेल्या झाडापाशीकोकिळा आलीम्हणाली, गाणं गाऊ का?झाड बोललं नाहीकोकिळा उडून गेली. शिणलेल्या झाडापाशीसुगरण आलीम्हणाली, घरटं बांधू का?झाड बोललं नाहीसुगरण निघून गेली. शिणलेल्या झाडापाशीचंद्रकोर आलीम्हणाली, जाळीत लापु का?झाड बोललं नाहीचंद्रकोर मार्गस्थ झाली. शिणलेल्या झाडापाशीबिजली आलीम्हणाली, मिठीत येऊ का?झाडाचं मौन सुटलंअंगाअंगातुन होकारच तुफान उठलं! – कुसुमाग्रज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *