कोलंबसचे गर्वगीत
हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारेविराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविताआणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतानजमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान…